कोल्हापूर प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसानं चांगलंच थेमान घातलंय. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटूंबाचां संसार उद्वस्त झालाय. महापूरामूळं अनेक घरं रस्त्यावर आलेत तर अनेकांचं स्थलांतर करण्यात आलंय. मुक्या जनावरांपासून माणसांपर्यंत सर्वचजण पूराच्या पाण्यात अडकलेत.
अशात एक पोलीस काॅन्स्टेबल खांद्यावर दोन चिमुकल्यांना घेऊन कंबरेपर्यंत येणार्या पाण्यातून वाट काढत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या पोलीस काॅन्स्टेबलचं सोशल मिडियावर कौतुक होतंय. सदर पोलिस काॅन्स्टेबलचं नाव पृथ्वीराज जडेजा असल्याचं समोर आलं असून ते मोरबी पोलीस स्टेशनचे असल्याचं समजतंय.
जडेजा यांनी पुराच्या पाण्यातून दीड किलोमीटर चालत दोन मुलींना आपल्या खांद्यावर घेऊन त्यांचे प्राण वाचवल्यानं महाराष्ट्रभरात त्याचं कौतुक होतंय. सध्या सांगली आणि कोल्हापूरातील पूराचं पाणी ओसरलं असून मदत कार्य युद्धपातळीवर सुरुय. महाराष्ट्रभरातून मदतीचा ओघ सुरु असून गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत.