टीम, HELLO महाराष्ट्र | लाडक्या गणरायाच्या अगमानला अवघे काही तास उरले आहे. प्रत्येक घरात गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. आपल्या आवडीचा गणराया खरेदीसाठी परिवारासह नागरिक बाजारात दाखल होत आहेत तर मोठी गणेशमूर्ती खरेदीसाठी अनेक छोट्या-मोठ्या मंडळांची कार्यकर्ते देखील बाजारात दाखल होत आहे. दगडूशेठ हलवाई, ब्राह्मण बैठक, लोड चौरंग, तुळशीबाग, लालबागचा राजा, कसबा गणपती, अशा विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहे.
एक फुटापासून ते 15 फुटा पर्यंतच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या वर्षी लहान मूर्तीच्या रकमेत पाच टक्के तर मोठ्या गणेशमूर्ती च्या रकमेत 10 टक्के वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांनी याचे कारण जीएसटी आणि कच्च्या मालाची वाढलेले भाव असल्याचे सांगितले. भावात किरकोळ वाढ जरी झाली असली तरी या वर्षी चांगला फायदा होईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बाजारात उत्साह दिसत असल्याने विक्रेत्यांना या वर्षी चांगल्या नफ्याची अपेक्षा आहे.