गली गली में शोर है नरेंद्र मोदी चोर है – प्रकाश आंबेडकर

0
31
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | सुनिल शेवरे

बहुजन वंचित आघाडी चं पहिलं अधिवेशन सोलापुर येथे पार पडले. त्यावेळी आंबेडकरांनी पंतप्रधानांवर ‘गली गली में शोर है नरेंन्द्र मोदी चोर है’ असा जोरदार हल्ला केला. ‘हे सरकार चोरांचं सरकार आहे, लुटारुंचं सरकार आहे असं म्हणुन आंबेडकर यांनी मोदी सरकारवर निशाना साधला.
२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. मोदी हे सर्वाधिक खोटारडे पंतप्रधान आहेत. पुण्यातील सभेत मोदी यांना चोर म्हटल्याने माझ्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरीसुद्धा मी त्यांना चोरच म्हणणार. भाजपची मोदी लाट घालविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसमवेत कॉंग्रेसला घेऊ. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरून भाजपवर टीका केली. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांचे आरोप फेटाळले. त्यामुळे आता कॉंग्रेस राष्ट्रवादीसमवेत युती करणार का? त्यांची नीतिमत्ता पाहावी लागेल, असेही ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here