औरंगाबाद प्रतिनिधी | महात्मा गांधींच्या हत्येत सहभागी असणार्या विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न कसा दिला जाऊ शकतो असा सवाल खासदार अस्सउद्दीन ओवेसी यांनी सरकारला केलाय.
चीफ जस्टीस कपूर कमिशनच्या इन्कवायरी रिपोर्ट मध्ये गांधी हत्या आणि हत्येचा कट रचल्या मध्ये सावरकरांचे नाव आलेले आहे. अशा व्यक्तीला कसे भारतरत्न दिले जाऊ शकते असा सवाल खासदार अस्सउद्दीन ओवेसी यांनी सरकारला विचारला आहे.
भारतरत्न द्यायचे असेल तर देशासाठी बलिदान दिलेल्या भगतसिंग, सुखदेव, अश्फाक उल्ला खान यांना द्या. भाजप ने आपली विचारधारा प्रत्येक गोष्टीत आणू नये असे ओवैसी म्हणालेत. प्रकाश आंबेडकर यांनीही सावरकर यांना भारतरत्न देण्यास विरोध दर्शवला आहे.