औरंगाबाद प्रतिनिधी। चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा कमी किमतीत विकण्यासाठी आलेल्या व विकत घेणाऱ्या तिघांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एक कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या हजार पाचशेच्या नोटा पोलिसांनी आज जप्त केल्या.
इसाक शब्बीर शाह वय-40 (रा.गंगापूर) असे नोटा बदलण्यासाठी आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मोहम्मद नईम मोहम्मद इब्राहिम व मोहम्मद इलियास मोहम्मद युनूस असे जुन्या नोटाच्या बदल्यात चलनातील रोकड देण्यासाठी आलेल्या दोघांची नावे आहे.
मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील व सध्या औरंगाबादेतील गंगापूर येथे वास्तव्यास असलेला आरोपी इसाक हा चलनातून बाद झालेल्या हजार पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा शहरात बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यांनी उस्मानपुरा पोलिसांना दिली होती. या माहिती वरून पोलिसांनी उस्मानपुरा भागातील गोपाळ टी पॉईंट येथे सापळा रचला आणि आरोपिना अटक केली त्यांच्या ताब्यातून चलनातून बाद झालेल्या 99 लाख 65 हजार रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहे. या प्रकरणी उस्मापुरा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या नोटा बदलून देणारे रॅकेट तर सक्रिय नाही ना ? या पूर्वी अशी नोटांची अदला बदल झाली का? नोटा विकत घेऊन ही टोळी त्याचे काय करते याचा तपास पोलीस करीत आहेत.