व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही पदवीधर (Graduate) आहात का ? मग करा पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी

पुणे प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक सुरु असतानाच निवडणूक आयोग विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात मतदारांची नाव नोंदणी करून घेणार आहे. येत्या १ ऑक्टोम्बरपासून या नाव नोंदणीला सुरुवात होणार असून ३१ ऑक्टोम्बर हि पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जुलै २०२० मध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पदवीधर असणाऱ्या व्यक्तींकडून छापील स्वरूपात अर्ज मागवण्यात आले आहेत. पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणारा आमदार ६ वर्ष पदवीधर वर्गाचे प्रश्न सभागृहात मांडत असतो. त्याच प्रमाणे शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रात सरकारचे धोरण काय असावे या संदर्भात सभागृहात भाष्य करणे या आमदाराकडून अपेक्षित असते.

पुणे पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी पात्रतेच्या अटी
१. मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याऱ्या व्यक्तीने १९४७ ते २०१७ या कालावधीत कोणत्याही शाखेचे किमान पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. अर्थात तो व्यक्ती पदवीधर (Graduate) असावी

२. मतदार म्हणून नाव नोंदणी करू इच्छिणारी व्यक्ती पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पैकी कोणत्याही एका जिल्ह्याची कायमची रहिवासी असावी.

३. पदवीची आणि रहिवासाची सर्व कागदपत्रे त्याने छापील अर्जाला जोडून देणे आवश्यक.

आवश्यक कागद पत्रे
१. वयाचा पुरावा : आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक.
२. रहिवासी पुरावा : रेशन कार्ड, लाईट बिल, जमिनीचा ७/१२ उतरा यापैकी एक.
३. शिक्षणाचा पुरावा : पदवीचे अंतिम गुणपत्रक(Graduation marks sheet ), पदवी प्रमाणपत्र ( Degree certificate)
४. याच सोबत मतदाराचे २ रंगीत फोटो देणे देखील अनिवार्य आहे.

छापील अर्ज कोठून घ्यावा आणि कोठे करावा
आपला कायमचा पत्ता ज्या ठिकाणचा आहे. त्या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभागात या संबंधीचा छापील अर्ज दिनांक १ ऑक्टोम्बरपासून उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपण १ ऑक्टोम्बरपासून ३१ ऑक्टोम्बर पर्यंत वरील कागदपत्रासह जाऊन हा अर्ज भरून देऊ शकता. १ नोव्हेंबर पासून पुणे पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी बनवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यादीत समाविष्ट झाले आहे का याची खात्री देखील करू शकणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अर्ज हा तहसीलदार कार्यालयात जाऊनच भरावा लावणार आहे. याची नोंद घ्यावी.

अधिक  माहितीसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या खाली दिलेल्या टोला फ्री नंबरवर संपर्क साधा

१८००२२१९५०