जिंतूर विधानसभेच्या पारंपारिक लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष

0
139
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनीधी| गजानन घुमारे 

परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या लढती पैकी जिंतूर विधानसभा लढतीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. आक्‍टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी जोरदार तयारी चालवलेली असताना या ठिकाणी बोर्डीकर व भांबळे यांच्यातील परंपरागत लढतीकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे . यावेळी वंचित बहुजन आघाडी फॅक्टर या लढतीत महत्त्वाची भूमिका निभावणार हे मात्र नक्की.

वंचित खेळतंय काँग्रेस आघाडीसोबत पाठशिवणीचा खेळ ; आघाडीची मोठी ऑफर वंचितने धुडकावली

जिंतुर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 1990 पासून जिंतूर विधानसभेमध्ये बोर्डीकर यांनी चार वेळा, कुंडलिक नागरे यांनी एक वेळा तर विजय भांबळे यांना एक वेळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता आले आहे. सन 1990 पासून 1999 च्या विधानसभा निवडणुकी मध्ये रामप्रसाद बोर्डीकर यांनी दोनवेळा सलग विजय मिळवला होता. 1999 मध्ये माजी आमदार स्वर्गीय कुंडलिक नागरे यांनी बोर्डीकर यांची हॅटट्रिक थांबवत विजय मिळवला होता. या पंचवार्षिक नंतर 2004 साली बोर्डीकर पुन्हा निवडून आले होते .तर 2009 मध्ये विजय भांबळे यांचा अवघ्या बाराशे मतांनी पराभव केला होता. 2014 च्या पुढील पंचवार्षिकमध्ये आ .विजय भांबळे यांनी मागील पराभवाचा वचपा काढत तब्बल 27 हजार मतांनी मोठा विजय मिळवला होता .तत्पूर्वी एवढ्या मताधिक्याने बोर्डीकर यांनाही विजय मिळवता आला नव्हता. 2009 साली जिंतूर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये पूर्वी पाथरी विधानसभा मतदारसंघात असणारा सेलू तालुका नव्याने जोडण्यात आला. त्यामुळे या विधानसभेचे राजकीय समीकरणे बदलली आहेत. पुनर्रचनेत पूर्वी व पुनर्रचनेनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची येथे पकड आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेत जिंतूर विधानसभेतून शिवसेनेला आश्चर्यकारकरित्या मताधिक्य देण्यात आलंय .

या तारखेला पुन्हा सुरु होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा

त्यामुळे येणारीे विधानसभा रंजक ठरणार आहे . युतीच्या वाटाघाटींमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, पण माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केल्याने व यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची कन्या मेघना बोर्डीकर लोकसभा लढवण्यास इच्छुक होत्या . पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास बंड करून निवडणूक लढवण्याचा त्यांनी निश्चय केला होता .दरम्यान शिवसेनेच्या वतीने खासदार संजय जाधव यांनी जिंतूर विधानसभेसाठी उमेदवारी देण्याचा शब्द देत मनधरणी केली होती अशी चर्चा त्यावेळी झाली असे बोलले जाते .त्यामुळे आता स्वतः रामप्रसाद बोर्डीकर किंवा त्यांची कन्या मेघना बोर्डीकर यांच्या पैकी एक जण भाजपकडून निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मतदारसंघ पिंजून काढत शिवसेनेकडून इच्छुक असणारे व मागील निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढणारे राम खराबे यांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे .तर भाजपचे जुने कार्यकर्ते संजय साडेगावकर हेही भाजपकडून इच्छूक असू शकतात. माजी आ . स्व . कुंडलीक नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे हे परभणी मतदारसंघात काँग्रेस कडून इच्छूक असल्याने त्यांची जिंतुर मधुन माघार आहे . प्रताप देशमुख यांनी मागील काही दिवसांपासून मतदारसंघातील गाठीभेटी वाढविल्या आहेत.

आमदार भालके भाजपच्या वाटेवर ; थोरातांनी घेतली भालकेंची फिरकी

ते रासप , शिवसेने नंतर आता वंचित बहुजन आघाडी कडून लढण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने पुनर्रचनेनंतर जिंतूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती .2014 सली ते पाथरी विधानसभा मतदार संघात मनसेकडून मैदानात उतरले होते दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला. पण आता जिंतूर मतदारसंघात ते परत शिवसेनेकडून उमेदवारी मागतात का हा प्रश्न अनुत्तरित आहे.

नवरा कामावर गेला की बायको सुरु करायची सेक्स रॅकेट ; मुंबईत घडत होता हा धक्कादायक प्रकार

दरम्यान 21 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या सभेचे तिन ठिकाणी आयोजन आहे .त्यातील पहिली सभा सेलू येथे घेण्यात येणार आहे त्यानंतर पाथरी, परभणी असे नियोजन आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सभा घेतील त्या सर्व विधानसभेच्या जागा शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळे भाजप या तीन जागेवर दावा करते का ? असा प्रश्न चर्चीला जातोय . या चर्चेने शिवसेनेच्या इच्छुकांचे भविष्य मात्र टांगणीला लागले आहे. दरम्यान जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र राजकिय पक्षांच्या युती, आघाडी झाल्यावर स्पष्ठ होईल. मात्र वंचीत फॅक्टर याही मतदारसंघात प्रभावी व निर्णायक ठरणार यात शंका नाही . युती, आघाडी झाली तरी जिंतुर मध्ये चौरंगी लढत पाहायला मिळेल असे राजकिय जाणकारांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here