परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
ट्रक आणि दुचाकी यांच्यातील भीषण अपघातात परभणी येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. दवाखान्यात मोटारसायकल वरून परभणी येथे जाणाऱ्या दांम्पत्याची गाडी समोरील ट्रकवर धडकून झालेल्या भिषण अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय.
पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथून भागवत बापुराव गोंगे वय २७ वर्षे हे आपल्या पत्नी आरती भागवत गोंगे वय २१ यांना परभणी येथिल दवाखाण्यात घेऊन जात होते. यावेळी मानवत तालूक्या जवळील राष्ट्रीय महामार्ग 61 असलेल्या रत्नापुर येथे मँक्स जीपला ओव्हर टेक करताना परभणीकडून येणाऱ्या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने मोटारसायकल वरिल भागवत व पत्नी आरती रोडवर पडल्याने व पाठीमाघून येणाऱ्या मँक्सच्या खाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर युवकाचा उपचारादरम्यान मृत्यु झालायं.
जखमी युवकास मानवत येथिल खाजगी रूग्णालयात आनले होते पण प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारा साठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले होते . दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे लग्न चार ते पाच महिण्या पुर्वी गंगाखेड तालुक्यातील झोलप्रिपरी येथील मुलीशी झाले होते . घटना समजल्यानंतर दोन्ही गावात शोककळा पसरली आहे.
हे पण वाचा –
पालम मध्ये मुख्य चौकात जाळपोळ,दोन गटातील वाद चिघळला
पोलीस ठाण्यात वकीलास लाथा-बुक्यानी मारहाण
जिंतुर तालुक्यातील 16 गावे अंधारात
राष्ट्रीय महामार्गावर टोमॅटोचा टेम्पो पलटला, रस्त्यावर टोमॅटोचा खच