नागपूर । कृषी विधयेक राज्यसभेच्या पटलावर चर्चेसाठी आली असताना सभागृहाच्या उपसभापतींची भूमिका सदनाच्या प्रतिष्ठेची आणि त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसंच सदस्यांनी केलेल्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देत एक दिवसाचे अन्नत्याग करत असल्याचं जाहीर केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी खासदाराच्या निलंबनाला विरोध केल्यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी संयत प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शरद पवारांनी पत्रकार परिषदेत विधेयकाला कुठेही विरोध केलेला नाही. त्यांनी काल जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईच्या निमित्ताने विरोधी पक्षाला समर्थन दिलं. पण मला असं वाटतं की राज्यसभेतील सदस्य असंशोभनीय वागले नसते तर आज पवार साहेबांना उपवास घोषित करावा लागला नसता. त्यांचं वागणं अशोभनीयच होतं. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही”.
अन्नत्यागाची घोषणा करताना शरद पवार म्हणाले..
निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांना समर्थन म्हणून आपणदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. “राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी उपोषण सुरु केलं असून आपल्या मनातील भावना सभागृहाबाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं,” असं शरद पवार यांनी म्हटलं होत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.