इंदौर : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपट मध्यप्रदेश राज्यामध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. छपाक हा चित्रपट उद्या १० जानेवारी रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे. मध्यप्रदेशमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे. छपाक हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून तरुणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याविषयी हा चित्रपट आहे.
Deepika Padukone’s film #Chhapaak made tax-free in Madhya Pradesh pic.twitter.com/GHo19AuCOz
— ANI (@ANI) January 9, 2020
जेएनयू येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिल्याने अभिनेत्री दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाविरोधात सोशलमिडीयावर मोहीम चालवण्यात येत आहे. बॉयकॉट छपाक हा हॅश टॅग ट्विटरवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. यानंतर छपाकच्या समर्थनार्थ देखील सोशलमिडीयावरून मोहीम राबविण्यात येत आहे.