मुंबई : नक्सली विरोधी मोहिमेत सुरक्षा दलाने गडचिरोलीमध्ये ३७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीमधील बोरिया जंगल परिसारात झालेल्या चकमकीमधे महाराष्ट्र पोलिसांच्या सी ६० जवानांनी आणि सी.आर.पी.एफ ने ही कामगीरी केली आहे. रविवार आणि सोमवारी झालेल्या या मोठ्या कारवाईनंतर लवकरच अनेक नक्सली शरण येण्याची अपेक्षा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी व्यक्त केली आहे.
“आम्ही नक्सली चळवळीचा वित्तपुरवठा तोडला आहे. त्यामध्ये आम्हाला यश आल्याने येत्या काही महिन्यात अनेक नक्षलवादी पोलिसांना शरण येतील. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमारेषेवर ही चळवळ सक्रिय असून पोलिसांची त्यावर नजर आहे.”, असे सतीश माथूर यावेळी म्हणाले.