नरेंद्र मोदींच्या रुपाने ‘हिटलर’चा पुनर्जन्म – जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद, हॅलो महाराष्ट्र टीम – नरेंद्र मोदींच्या रूपाने हिटलरचा पुनर्जन्म झाल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. औरंगाबाद येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात ते बोलत होते. आजही आसाममधील १४ लाख हिंदूंकडे कागदपत्रे नाहीत. आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या अनेक परिवारांकडे, भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, ते लोक जुने पुरावे कोठून आणणार, असा सवाल आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.

गोळवलकर विचार विरुद्ध गांधी विचार असा लढा

लवकरच मोदी सरकार सोशलमिडियासाठी कायदा आणून तुम्ही काढलेले फोटो,किंवा तुमचं संभाषण देखील मोदींना कळणार आहे. त्यांना तसंही दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.देशात आता दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची वेळ आली असून हा लढा गोळवलकर विचाराविरुद्ध गांधी विचार असा आहे, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.