नवीन कायद्याप्रमाणे जमीन संपादीत केल्या जातील – कृषिमंत्री अनिल बोंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी| औद्योगिक वसाहतीकरिता आता नवीन कायद्याप्रमाणे जमीन संपादित केल्या जाणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले. आपल्या ट्विटवर अकाउंटवर एका व्हिडिओ द्वारे त्यांनी ही माहिती दिली. अनिल बोंडे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात नवीन औद्योगिक वसाहतीकरिता जमीन संपादीत करण्यात येणार होत्या त्याचसंबंधी अधिक खुलासा करत त्यांनी ही माहिती दिली. जमीन संपादीत करताना बागायती व ओलित जमीन संपादीत केल्या जाणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांची सहमती असल्यासच जमीन संपादीत केली जाईल. असे त्यांनी व्हिडिओत स्पष्ट केलं आहे.

व्हिडिओत ते पुढे म्हणाले की,” मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत आले असता त्यांनी घोषित केले होते की, जिल्ह्यातील सध्याची एमआयडीसी अपुरी पडत आहे, कारखाने पाईपलाईन मध्ये आहेत, रोजगार उपलब्ध करायचा आहे त्यामुळे अतिरिक्त एमआयडीसी तयार करायची गरज आहे. तेव्हा त्यांनी आपले शब्द पळाले आहेत”. तेव्हा नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादीत करताना काय नियम आणि निकष  अवलंबले जातील याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

 

 

Leave a Comment