रत्नागिरी प्रतिनिधी। नाणार रिफायनरी विरोधातली टप्पा दोनची संघर्षाची ठिणगी आज पुन्हा एकदा पडली. मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या रिफानरी प्रकल्पाला केलेल्या समर्थनानंतर आता याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटू लागले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या जोडीनं मैदानात उतरली आहे.
नाणार पंचक्रोशीतल्या तारळ गावात प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली. ‘याद राखा’ रिफानरी प्रकल्पासाठी गावाच पाय देखील ठेवू देणार नसल्याचं शिवसेनेनी जाहिर करत नाणार रिफानरी विरोधात पुन्हा दंड थोपटले आहे.