मुंबई : पुढील वर्षी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तरुणाईला आकर्षीत करण्यासाठी व बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने मेगा भरती जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मेगा भरती ही मागील वीस वर्षांतील सर्वात मोठी मेगा भरती ठरणार आहे.
२०१९ हे निवडणुकांचे वर्ष असल्याने सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपने बेरोजगारीला उतारा म्हणून सर्व खात्याची मेगा भरती काढली आहे. बेरोजगारी मुळे सरकारवर तरुण नाराज आहेत. या नाराजीला थोडासा दिलासा म्हणून ही मेगा भरती आखली असल्याचे बोलले जात आहे. तसेच या मेगा भरतीची अधिसूचना ३१ जुलै पर्यंत सुटणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एकुण ७२,००० जागांसाठी मेगा भरती होणार असून ती दोन टप्प्यात होणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे.