सोलापूर प्रतिनिधी । पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दक्षिणा पेटीमधून पैसे चोरताना एका चोरट्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. नागरिकांच्या सतर्कतेमुळं मंदिराचं लाखोंचं नुकसान टळल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकायला येत होती.
काल दुपारी ३ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संतोष मोरे या चोरट्याने तब्बल ६ वेळा दक्षिणा पेटीतून पैसे चोरल्याच पोलिस काॅस्टेबल वामन यलमार यांच्या निदर्शनास आले. पोलिस यलमार यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता हा सर्व प्रकार समोर आला.
मंदिराची दक्षिणा पेटी पूर्ण भरली आहे . त्यातून बऱ्याच दिवसापासून पैसे न काढल्याने पेटीतील पैसे सहज चोरता येतात. हे या चोरट्याच्या लक्षात आल्याने तो वारंवार पेटीतून पैसे चोरत होता. हा प्रकार येथील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याच्यावर नजर ठेवली आणि तो जेव्हा पैसे चोरायला आला तेव्हा ही माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिस कॉन्स्टेबल वामन यलमार यांनी त्याला रंगेहात पकडले. पैशाचा मोह न आवरल्यान विठ्ठल दरबारातील हा चोर अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.