पंतप्रधान मोदींनी दिल्या मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचा आज ८७ वा वाढदिवस. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या मनमोहन सिंग यांना देशाच्या आर्थिक सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणून ओळखलं जातं. वाढदिवसानिमित्त देशभरातून मनमोहन सिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्रीच ट्विटरवरून डॉ मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ही भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. २००४ ते २०१४ या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. १९९१ साली देश आर्थिक संकटात सापडलेला असताना आपल्या आर्थिक धोरणांचा योग्य पाठपुरावा करत त्यांनी देशाला उदारीकरण,खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या पंक्तीत बसवलं. मौनी पंतप्रधान अशी टीका मनमोहनसिंग यांच्यावर करणाऱ्या नरेंद्र मोदींनी सद्यस्थितीत सर्व हेवेदावे बाजूला सारत मनमोहनसिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ नोव्हेम्बर १९३२ रोजी पंजाबधील गाह प्रांतात झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठासोबतच ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.