पक्षाला काडया करणारे कार्यकर्ते नको, निष्ठावंत कार्यकर्ते हवेत – नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “पक्षाला इकडून तिकडे जाणारे,गटबाजी करणारे, काड्या करणारे लोकं नको तर निष्ठावंत कार्यकर्ते हवेत, असे मत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते भाजपचे निष्ठवंत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

आनंदराव ठवरे हे भाजपचे जनसंघाच्या काळातील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांचा आज भाजपच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी गडकरींनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

“1974 मध्ये भाजपचे गंगाधरराव फडणवीस हे उपमहापौर झाले. त्यावेळी इतका आनंद झाला होता की जणू काही आपल्या पक्षाचं पंतप्रधानच झाला. आता माहीत झालं की उपमहापौर यांना काहीही अधिकार नसतात. मात्र पहिलं पद मिळाल्याने आम्ही खूप नाचलो होतो. आणीबाणीत पार्टी कठीण वेळेतून गेली. पार्टी चालवणे कठीण होते. मात्र आनंदराव पायऱ्याचे दगड आहेत. त्यांच्या परिश्रमातून पार्टी आज एवढी मोठी झाली,” असेही गडकरी म्हणाले.

Leave a Comment