किरकोळ कारणावरून पत्नीला मारणाऱ्या पतीस ५ वर्षे सक्त मजुरी शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
किरकोळ कारणावरून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम पाटील सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी ५ वर्षे सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दिनकर मछिंद्र नलवडे असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे.

सदरचा गुन्हा १३ जुलै २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास नलवडे वस्ती, मतकुणकी येथे आरोपीच्या घरात घडला होता. यातील जखमी दीपाली हिचे २०१२ साली लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दिनकर हा शेतीचे काम करीत होता. मागील दीड वर्षांपासून तो पत्नी दीपाली हिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देत होता. या घटनेच्या एक वर्ष अगदोर दिनकरने दीपालीला कात्रीने मारले होते. दि.१३ जुलै २०१७ रोजी आरोपी हा शेतातील काम उरकून घरी आला होती. त्यावेळी दीपाली घरामध्ये काम करत असताना दिनकरने तिच्याकडे पैसे मागितले. हातातील काम उरकून चहा करून देण्यास उशीर झाला. त्यामुळे तो चिडला. त्याने खलबत्त्यातील लोखंडी ठोबा दिपालीच्या डोक्यात मारला होते. त्यामुळे दीपाली बेशुद्ध पडली होती.

त्यानंतर तिला सासरकडच्या मंडळींनी मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दिपालीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीहोती. दिपालीच्या भावाने दिनकरच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिलीहोती. पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा करून पत्नी व अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदवले व यातील आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सदर साक्षीपुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी दिनकरला शिक्षा सुनावली.

Leave a Comment