पाणी भरताना पाय घसरुन तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चांदवड प्रतिनिधी | विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरुन विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना चांदवड येथील कानमंडळे येथे घडलीय. सदर घटनेमुळे कानमंडळे गावावर शोककळा पसरली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सुरेख जाधव असं मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती इयत्ता सातवीत शिकत होती. सुरेखा शुक्रवारी पाणी भरण्यासाठी घराशेजारील विहिरीवर गेली होती. पाणी भरत असताना तरुणीचा पाय घसरल्याने ती विहिरीत पडली. यावेळी पोहता येत नसल्याने सदर तरुणीचा बुडून मृत्यू झाला.

पावसाळा सुरू होऊन दीड महिन्या पेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही चांदवड भागात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. सुरेखा पाणी टंचाईची बळी ठरल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here