मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपुर येथे विधिमंडळाचे मान्सून सत्र भरणार आहे. उद्यापासून सुरु होणार्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलावून अनेक मुद्द्यांना वाचा फोडली आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोजीत केलेल्या सर्वपक्षीय चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे प्रकरण गाजत असतानाच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलवून विरोधकांची बोलती बंद केली असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे –
१.बोंडआळी ग्रस्त शेतकऱ्यांना २,१०० कोटी रुपयांची रक्कम वितरित
२.धुळ्यात अफवेतून झालेल्या हत्यांचा खटला जलद गती न्यायालयात चालवला जाणार.
३.शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळे पर्यंत कर्जमाफी योजना सुरू राहणार.३१ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची कार्यवाही उरकून घेण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
४.सिडको भूखंड घोटाळ्या संदर्भात विरोधक मागणी करतील ती समिती नेमुन चौकशी केली जाणार.
५.रेल्वेच्या पुलांचे ऑडिट पूर्ण झालेले नाही त्यातूनच अंधेरी रेल्वे स्थानकाच्या गोखले पुलाची दुर्घटना घडली असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.