पीडित कुटुंबियांची भेट घेवून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Ramdas Athavle
Ramdas Athavle
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर । सतिश शिंदे

ब्रम्हपूरी तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी अशोक केवळराम मेश्राम यांचा २ वर्षाचा मुलगा युग याची २२ ऑगस्ट २०१८ रोजी जादूटोणा व गुप्तधन मिळवण्याच्या अंधश्रध्देतून निर्दयी व अमानुषपणे गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्या खंडाळा गावाला केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता मुलाचे वडील अशोक मेश्राम व त्यांचे कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली.

यावेळी श्री.आठवले यांनी अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ अंतर्गत नुकसानभरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेले ४ लक्ष १२ हजार ५०० रुपयाचा अर्थसहाय्याचा धनादेश युगचे वडील अशोक मेश्राम यांना सुपूर्द करुन त्यांचे व कुटुंबीयांचे सांत्वन केले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या व अत्यंत निंदणीय असलेल्या या हत्या प्रकरणाचा रामदास आठवले यांनी अत्यंत कठोर शब्दात निषेध केला. यावेळी माजी आमदार अतुल देशकर, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.