अकोला प्रतिनिधी | अकोल्यातील पातूर रोडवरील लाखनवाडा येथे पूर्व वैमनस्यातून आज दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत तलवारीसह कुऱ्हाडीने तीन ते चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाच कुटुंबातील एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
लक्ष्मण दुधाजी डाबेराव असं मृतक व्यक्तीच नाव असून कृष्णा ओंकार सोळंके आणि हरी ओंकार सोळंके असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर सचिन दीपक वाकोडे, प्रवीण दीपक वाकोडे आणि सागर संतोष शिरसाट असे मारेकरांची नावे आहेत. वाकोडे आणि सोळंके या दोन्ही कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. याच वादातून वाकोडे कुटुंबातील सदस्यांनी सोळंके कुटुंबावर तलवारीसह कुर्हाडीनं हल्ला चढविला. या हल्ल्यात तिघे जण गंभीर झाले.
त्यानंतर तातडीनं जखमींना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान, लक्ष्मण डाबेराव यांचा मृत्यू झाला. तर दोघांना कृष्णा आणि हरी पुढील उपचारासाठी नागपुर येथे रवाना करण्यात आलय. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जुने शहर व बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरनात सचिन वाकोडे, प्रवीण वाकोडे आणि सागर शिरसाट या तिन्ही मारेकर्याना ताब्यात घेतलंय.