पेट्रोल, डिझेलवरील वाहनांवर बंदी नाही- नितीन गडकरी

संग्रहीत छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | मंदीचा फटका बसलेल्या वाहन उद्योगाला दिलासा देणारी ही बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनं सुरूच राहतील. त्यांच्यावर बंदी येणार नाही, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. ईलेक्ट्रिक वाहन उद्योगांना चालना देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांच्या विक्रीवर त्याचा थेट परिणाम झाल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनं आणि त्यांच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. तसंच धावत असलेल्या पेट्रोल-डिझेल गाड्यांवरही बंदी घातली जाणार नाही.

ग्राहक आयसीई (इंटर्नल कंबशन इंजिन) असलेली वाहनं घ्यायला कचरत आहेत. पण या वाहनांवर बंदी घालण्याचा कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय. तसंच वाहन उद्योगातील मंदी दूर करण्यासाठी सरकार आणि अर्थमंत्री प्रयत्नशील असल्याचं गडकरी म्हणाले.बीएस-६ इंजिन बनवण्यासाठी येणाऱ्या उत्पादन खर्चामुळे वाहनांच्या किंमती वाढल्या आहेत. या संदर्भात वाहन उद्योगातील तज्ज्ञांनी नितीन गड करींची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. यापार्श्वभूमीवर गडकरी बोलत होते.

आधुनिक बीएस- ६ या इंजिनामुळे वाहनांच्या किंमती वाढल्या आहेत. बीएस- ४ वरून वाहनांचे इंजिन बीएस- ६ करण्याचा अधिक आहे. यासंदर्भात आपण अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याशी चर्चा करू. जीएसटीमध्ये कपात करण्याचा प्रयत्न सरकार करेल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.