पेथाई वादळाच्या प्रभावाने ओएनजीसीचा समुद्रातील प्लांट कलंडला

Bengal Sea
Bengal Sea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आंध्रप्रदेश | काकीनाडावर पेथाई वादळाचा प्रभाव पडल्याने आंध्र प्रदेशच्या समुद्रातील काकीनाडाजवळ बंगालच्या समुद्रात असलेला ओएनजीसी प्लांट कोसळल्याची घटना घडली आहे. ओएनजीसीच्या ऑयल रिग प्लांटला मागील आठवड्यात वादळाचा फटका बसला.

मात्र यावेळी तिथे अडकलेल्या ओएनजीच्या १३ कर्मचा-यांना सुरक्षितपणे एअरलिफ्ट करण्यात आले. ओएनजीसीने तात्काळ नौदलाला याची माहिती दिली. त्यानंतर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाने चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्व १३ कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट करून सुखरूप बाहेर काढले.

अरबी समुद्रातील वायूसाठा काढण्यासाठी ओएनजीसीने हा प्लांट उभारला आहे. जीवीतहानी झाली नसली तरी यामुळे प्लांटचे मोठे नुकसान झाले आहे.