सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्धेला तब्बल १० तोळ्याला ठकविल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना विटा येथील विवेकानंदनगर येथे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विटा पोलिसांत राधा मुकुंदराव लंगडे यांनी फिर्याद दिली आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. विवेकानंदनगरात राधा लंगडे या कुटुंबियांसमवेत राहतात. आज मुलगा आणि सून नोकरीनिमित्त बाहेरगावी गेले होते. तर नातू शनिवार सकाळची शाळा असल्याने घरी नव्हते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर दोन अनोळखी तरुण लंगडे यांच्या घरासमोर आले.
त्यांनी सध्या दसऱ्याचा सण जवळ आला आहे. घरातील पितळेची भांडी पॉलिश करुन देतो असे सांगितले. त्यांनी देवघरातील तांब्याची भांडी पॉलिश करुन दिली. त्यानंतर तुमचे सोन्याची दागिनेही आम्ही पाॉलिश करुन देतो असे सांगून काणातील कर्णफुले पॉशिल करुन दिली. त्यानंतर सोन्याच्या 45 गॅ‘मच्या चार बांगड्या व 50 गॅ‘मच्या दोन पाटल्या असा ४ लाख 45 हजार रुपये किंमतीचे दागिने पॉलिश करण्यासाठी त्या दोन युवकांनी घेतले. घरातील डब्यात हळद व त्यांच्याकडील पावडर टाकली. तो सोन्याचा डबा गॅसवर गरम करा सोने चांगले पॉलिश होईल असे सांगितले.
घरात गेल्यावर शंका आल्याने डब्यात हात घालून पाहिले असता डब्यात सोन्याचे दागिने नव्हते. घराबाहेर येवून पाहिले असता ते युवक लंपास झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना सांगितल्यावर त्यांनीही त्या युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते मिळून आले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर लंगडे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.