बुलढाणा प्रतिनिधी | प्रेयसी आणि तिच्या नातेवाईकांकडून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्यामुळं त्यांच्या त्रासाला कंटाळून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली. याप्रकरणी प्रेयसी आणि तिला मदत करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे.
विष्णू श्रावण जाधव अस आत्महत्या करणाऱ्या इसमाच नाव आहे. विष्णू हा चटई बनवण्याच काम करत होता. त्याच्या प्रेयसीने त्याला लग्नासाठी गळ घालून आपल्या साथीदारांसह त्याला ब्लॅकमेलिंग करीत असल्यान सोमवारी विष्णू जाधव यांनी चटई गोदामांमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्या करण्यापूर्वी जाधव यांनी प्रेयसीसोबत झालेला संवाद व होत असलेली ब्लॅकमेलिंग बाबत पुरावे ऑडिओ क्लिपच्या रूपाने आपल्या मुलीला देऊन जाधव यांनी आत्महत्या केली. याबाबत मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात प्रेयसीसह आणखी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रेयसीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयं तिला ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.