१.अल्पसंख्याक शिक्षण संस्थेत मागासवर्गीयांना आरक्षण नाही-सर्वोच्च न्यायालय
अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.सदरची याचिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केली होती.सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे.
२.गणेशोत्सवा दरम्यान थर्माकोल वापरास बंदीच.मुंबई उच्च न्यायालय
थर्माकोल उत्पादक आणि सजावटीचे कलाकार यांनी गणेशोत्सवात थर्माकोल ची बंदी शिथिल करावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर न्यायालयाने काल निकाल देत याचिका फेटाळली आहे.तसेच राज्य सरकारच्या प्लॅस्टिक बंदीचे समर्थन केले आहे.
३.नवाज शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये अटक.
बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज या दोघांना काल रात्री लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे.नॅशनल अकॅण्टटेब्यालिटी ब्युरो आणि पाकिस्तानचे हंगामी सरकार यांनी ही अटक घडवून आणली आहे.
४.मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहात आता घेऊन जाता येणार बाहेरील खाद्यपदार्थ.
अव्वाच्यासव्वा दर आकारून मल्टिफ्लेक्स मध्ये ग्राहकांची लूट केली जात होती.याच विषयावर काल विधान परिषदेत धनंजय मुंडेंनी लक्षवेधी सूचना मांडली या सूचनेला सरकारच्या वतीने उत्तर देताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की १ऑगस्टपासून मल्टिफ्लेक्स मध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास चित्रपटगृहात मज्जाव केल्यास त्या चित्रपटगृहावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
५.दादा जे.पी.वासवानी यांच्यावर अंत्यसंस्कार.
आध्यत्मिक गुरू दादा जे.पी.वासवानी यांच्यावर काल सायंकाळी साडेसहा वाजता साधू वासवानी मिशनच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रसंगीं माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.