बिघाड इव्हिएम मध्ये नाही तर विरोधकांच्या खोपडीत आहे

0
106
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजानदेश यात्रा लातूर मध्ये पोहचली आहे. यावेळी जनतेशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, ” गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याना सत्तेची मुजोरी व माजोरी होती सामान्य माणसाच्या विकासाकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता हे विरोधक आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमला देत आहेत. सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगले अन इकडे सुधाकर शृंगारे व प्रतापराव चिखलीकर निवडून आले तर, ईव्हिएममध्ये बिघाड आहे. खरं तर बिघाड ईव्हिएम मध्ये नाही तुमच्या खोपडीत आहे.’ अशी जळजळीत टीका त्यांनी यावेळी केली.

 

२००४ ते २०१४ पर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने सर्व निवडणूका जिंकल्या तेव्हा ईव्हिएम चांगले होते आणि आता वाईट आहे असा आरोप करणे चूकीचे असल्याचा आरोप करुन काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था नापास झालेल्या विद्यार्थ्यासारखी आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील आयोजित रॅलीत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here