औरंगाबाद प्रतिनिधी। बिअर बारचे गेट तोडून चोरटयांनी बार मधील रोख रक्कम आणि विदेशी दारूच्या बाटल्या लंपास केल्याची घटना शिऊर बंगला येथे घडली. चोरी करताना चोरटे सिसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे.
या घटनेच्या माहितीनुसार, गोकुळ बाबासाहेब सूर्यवंशी यांच शिऊर इथं रेस्टॉरंट आणि बार आहे. हा बार आज पहाटे चार वाजेच्या सुमारास ३ चोरटयांनी फोडला. बारचे लोखंडी चॅनेल गेट तोडून चोरटयांनी सीसीटीव्ही असतानाही या चोरटयांनी दुकानात प्रवेश केला. विशेष म्हणजे दुकानात प्रवेश करण्याच्या अगोदर या चोरटयांनी हा सीसीटीव्ही पहिला होता. हे पाहून त्यांनी ओळख लपण्यासाठी आपली तोंड झाकून दुकानात प्रवेश केला.
दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेले 38 हजार 500 रुपये रोख व विविध विदेशी बनावटीची दारू असा सुमारे 50 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती.या चोरट्यांची हिम्मत पाहून हे अट्टल चोर असले पाहिजेत अशी चर्चा परिसरात होत आहे. पण दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत चाललं असल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालय