भाजपात असल्याचा महाडिकांना पडला विसर; राष्ट्रवादीला मतदान करा म्हणून केले आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सोलापुरात महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजपमध्ये प्रवेश केला. धनंजय यांच्या प्रवेशामुळे संपूर्ण महाडिक कुटुंब भाजपामय झाले.

महाडिक यांच्या प्रवेशामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची जिल्ह्यातील ताकद वाढली. मात्र धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या डोक्यातून घड्याळ चिन्ह मात्र गेलं नसल्याचे दिसून आले.

आपले चुलत बंधू अमोल महाडीक यांच्या प्रचारार्थ गोकुळ शिरगाव येथे घेतलेल्या सभेदरम्यान मतदान करण्याचा आवाहन करताना ‘धनंजय महाडिक यांनी चक्क घड्याळ निशाणीसमोरील बटन दाबण्याचे’ उपस्थितांना आवाहन केले. मात्र आपली चूक झाली हे लक्षात येताच त्यांनी ‘कमळ चिन्हा’चा उल्लेख करताच सभास्थळी एकच मोठा हशा पिकला. दरम्यान शरीराने भाजपा मध्ये गेलेल्या धनंजय महाडिकांच्या हृदयात मात्र ते म्हणतात त्या प्रमाणे शरद पवारच असल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

इतर काही बातम्या-