कोल्हापूर प्रतिनिधी। ‘शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडी च्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे जसा पवारांवर गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.’ असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हा बद्दल व्यक्त केले.
यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ही शेट्टी यांनी सांगितले. ते काल शिरोळमध्ये बोलताना होते. ‘राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला असला तरी ज्यांनी कर्जे घेतली ते मोकाटच आहे. कर्ज घेतलेले अनेकांनी सध्या भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे या भाजपावासींवर ईडी कारवाई करणार का?’ असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे.
याचसोबत ‘चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्याची हमी घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्हा दाखल करावा’अशी मागणीनीही राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच ‘ईडीकडून निवडणुकीच्या वातावरण निर्मितीपोटी अशी कारवाई केली जात’ असल्याचा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला आहे. तेव्हा आता राजू शेट्टी या प्रकरणात खरंच काय भूमिका घेतात यावर सगळ्याचे लक्ष लागून आहे