मंत्रायलात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा असणार मनसेचा विधानसभा उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. मुंबईतल्या वांद्र्यातील एमआयजी क्लब येथे मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी मनसे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. यावेळी राज ठाकरे यांनी दोन उमेदवारांची नावे ही जाहीर केली आहेत. मंत्रालयात आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. नरेंद्र पाटील मनसेकडून निवडणूक लढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. तर नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार यांनीही मनसेत प्रवेश केला आहे. ते देखील देखील निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केले आहे.

राज ठाकरे हे 5 ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र ही प्रचारसभा कुठे असणार याची कोणतीही माहिती राज ठाकरेंनी दिली नाही. तसेच मनसे विधानसभेच्या किती जागा लढवणार याचीही माहिती राज ठाकरेंनी उघड केली नाही. तसेच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 5 तारखेला मिळतील, असे राज ठाकरेंनी सांगितले.

कोहिनूर कम्पाऊंड घोटाळ्याप्रकरणी त्यांची ईडी चौकशी झाली होती. त्यानंतर मनसे निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र, यावर राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा भूमिका मांडली जात नव्हती. अखेर, आज सोमवारी झालेल्या मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी पक्षाची या सगळ्या प्रकारावर ईडीच्या चौकशी नाट्यानंतर पहिल्यांदाच भूमिका मांडली. आता मनसेने ही विधानसभा निवडणुकूच्या मैदानात उडी घेतल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसते आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

आपला हर्षवर्धन पाटील व्हायला नको म्हणून भालकेंचा गपगुमान राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपचे सोशल इंजिनीअरिंग : अजित पवारांविरुद्ध गोपीचंद पडळकर भाजपचे उमेदवार

पुण्यातून विधानसभा लढविण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रकांत पाटलांना ब्राह्मण समाजाचा दणका

कल्याणात शिवसेनेचा भाजपा विरोधात एल्गार..

Leave a Comment