मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. कळंबोली येथे आज मराठा आंदोलकांनी पोलिस अधिक्षकांची गाडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या भागात मराठा समाजाने बंदचे आवाहन केले होते. तेव्हा कळंबोली येथे परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आलेल्या पोलीसांच्या गाडीवर आंदोलन कर्त्यांनी जबर दगडफेक केली. तसेच पोलीस अधिक्षकांची गाडी रस्त्यात पेटवली. यामधे कळंबोलीचे पोलिस अधिक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. पोलिसांचीच गाडी पेटवली गेल्याने कळंबोली परिसरात दहशतीचे वातावरण निर्मान झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला आहे. आंदोलकांना पांगवण्यात आता पोलिसांना यश आले आहे.
मराठा आंदोलनाचा आज सातवा दिवस आह. राज्य सरकार कसल्याही प्रकारे मध्यस्ती करण्यास तयार नसल्याने आंदोलन चिगळत चालले आहे. तसेच राज्याचे मंत्री मराठा आंदोलकांच्या बद्दल बेछूट विधाने करत असल्याने आंदोलक अधिकच संतप्त होत चालले आहेत. सरकारने यासंदर्भात तोडगा काढावा असा सूर जनसमन्यातून उमटत आहे.