पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे
महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्च्याचे अनेक मोर्चे होऊनही न्याय मिळत नसल्याने अखेरीस पाडव्याच्या मुहूर्तावर सुरेश पाटील यांनी ‘महाराष्ट्र क्रांती सेना ‘ या राजकीय पक्षाची घोषणा केली.
”एक मराठा लाख मराठा”अशी घोषणा असलेल्या मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी पक्ष स्थापन करण्याबाबत सप्टेंबर मध्ये झालेल्या मेळाव्यात राजकीय पक्षाची स्थापना करणार, अशी घोषणा करण्यात आली होती. अखेर पाडव्याच्या मुहूर्तावर या राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली असून “महाराष्ट्र क्रांती सेना” असे या पक्षाचे नाव आहे.
पक्ष स्थापन करताना मराठा समाजातील काही मंडळींचा या पक्ष स्थापनेला विरोध होता. मात्र या विरोधाला डावलुन पक्षाची स्थापना करण्यात आली. छत्रपतींचे वंशज, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा या पक्षास पाठिंबा आहे, असा दावा सुरेश पाटिल यांनी केला. पक्षाच्या स्थापनेनंतर हजारो तरुणांचा मोर्चा रायरेश्वर गडावर पोहोचला आहेत.