मला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे – आदित्य ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी |‘लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला, युतीला मते दिली त्यांचे आभार मानण्यासोबतच ज्यांनी मतं दिले नाही, त्यांचे मन जिंकायला आपण आलो आहे’ असे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी अमरावतीत पोहोचलेल्या जनआशिर्वाद म्हटले. शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून विदर्भात सुरू झाला असून आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी रात्री अमरावती शहरात पोहोचली. त्यावेळी विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या विजय संकल्प मेळाव्याच आयोजन शहरातील नवाथे चौकात करण्यात आले होते. ठाकरे मंचावर पोहोचले त्यावेळी ९ वाजून ५३ मिनिट झाली होती. १० वाजण्यापूर्वी सभा संपवायची असल्याने आपल्याकड केवळ ७ मिनिटं उरली असल्याचे त्यांनी भाषणाच्या प्रारंभीच सांगितले .

आतापर्यंत राज्यात ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळाला, तसाच भरघोस प्रतिसाद विदर्भात मिळत असल्यान माझी ‘एनर्जी’ वाढत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ‘अनेक राजकीय पक्षाचे लोकं निवडणुका आल्या की घरोघरी जाऊन मतं मागतात. मात्र निवडणुका संपल्या की, मतदारांना भेटतही नाही. मात्र शिवसेनेच अस नाही. शिवसेनेची प्रत्येक शाखा ही २४ तास, ३६५ दिवस जनतेच्या सेवेसाठी, मदतीसाठी तत्पर असते. मला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे, तो बेरोजगारीमुक्त, कर्जमुक्त असा असेल. मात्र तो एकट्यामुळे घडणार नाही, त्यासाठी आपणा सर्वांची साथ पाहिजे. ही जनआशीर्वाद यात्रा माझी तीर्थयात्रा आहे’ असही ते उपस्थित जनसमूहाला संबोधित करतांना म्हणाले.

Leave a Comment