महापूरामुळे बिघडलेला ट्रान्सफोर्मर दुरुस्त करणार्‍या वायरमचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

महापुराच्या तडाख्याने बंद पडलेला ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू झाला. संजय बाळासाहेब जाकले असे मृत झालेल्या वायरमनचे नाव आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुधगाव येथे ही घटना घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

जाकले हे आपल्या पत्नी, मुलांसह खोची येथे राहत होते. ते दुधगाव येथे वायरमन म्हणून काम करतात. दररोज ते खोचीतून दुधगावकडे ये-जा करुन नोकरी करीत होते. दुधगाव येथे महापुराच्या पाण्याने ट्रान्सफार्मर बंद पडला होता. तेथील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

आता महापुराचे पाणी ओसरु लागले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर जाकले हे दुधगाव येथील शिवगोंडा पाटील यांच्या जमिनीत असलेला ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यासाठी विजेच्या खांबावर चढले होते. दुरुस्ती सुरु असताना त्यांचा विजेचा जोरदार धक्का बसला. ते खाली कोसळले. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे घोषित केले. उत्तरीत तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

 

 

Leave a Comment