मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिलेल्या हिमांशू राॅय यांनी राहत्या घरात स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असणाऱ्या राॅय यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलाला चांगलाच हादरा बसला आहे. राॅय गेली २ वर्ष वैद्यकीय रजेवर होते. त्यांना हाडांच्या कॅन्सर झाला होता. अमेरीकेत जाऊन उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. परंतू आजारपणातून आलेल्या नैराश्यामधून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
हिमांशू राॅय हे १९८८ च्या बॅचचे आय.पी.एस. अधिकारी होते. आयपीएल मधील सट्टेबाजी पासून पत्रकार जेडे हत्याप्रकरणामध्ये तसेच लैला खान मर्डर केस ते अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरण अशा अनेक प्रकरणांच्या तपासात राॅय यांनी महत्वाची भुमिका बजावली होती.