सोलापुर प्रतिनिधी | राज्यात राष्ट्रवादी आणि काॅग्रेसाला सोडून सेना भाजपत प्रवेश करण्यासाठी अनेक आमदार आणि नेत्यांची चढाओढ सुरू असतानाच सोलापूर जिल्हयातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत हातात शिवबंधन बांधले आहे.
त्यानंतर माढ्याचे आमदार बबन शिंदेनी ही राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.
आमदार बबन शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांचे सलोख्याचे संबंध आज ही कायम आहेत.गेले अनेक दिवस आमदार शिंदे भाजपत प्रवेशासाठी इच्छुक आहेत पण त्यांना ग्रिन सिंग्नल मिळत नव्हता.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिंदेना प्रवेश देण्यासाठी हिरवा कंदिल मिळाल्यानंतर शिंदेनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गटवार बैठका सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपत जाण्याचा आग्रह धरला जात आहे.
एकूणच कार्यकर्त्यांचा मत प्रवाह विचारात घेता शिंदे लवकरच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. आमदार शिंदेच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीला आणखी मोठा धक्का बसणार आहे.