मी पुन्हा येईल म्हणणार्‍या फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. ‍‌१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज ८ नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांना राजीनामा देतेवेळी गिरिश महाजन, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रावसाहेब दानवे आदी नेते उपस्थित होते.

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम असून विधानसभेचे निकाल लागून १४ दिवस उलटले तरी अजून सरलार स्थापन झालेले नाही. फडणवीस राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे. फडणवीस पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.