हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. करोनापासून लोकांचा जीव वाचवण्यासाठी गरजेचा असलेला लॉकडाउनमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. लोकांनी लॉकडाउनचे पाळावा म्हणून पोलिस रस्त्यावर पहारा देत आहेत. मात्र, एकीकडे लोकांचा जीव वाचण्यासाठी लागू करण्यात आलेला हा लॉकडाउन एकाच्या हत्येचे कारण बनलं. लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडला म्हणून एका व्यक्तीने आपल्याच सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली भागात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक दुर्गेश पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. करोनामुळे कंपनीतील कामकाज बंद असल्याने तो आपल्या घरी परतला होता. दरम्यान, दुर्गेशचा मोठा भाऊ राजेश ठाकूर याने लॉकडाउन आहे त्यामुळे घराबाहेर निघू नको असं त्याला सांगितलं. मात्र, वारंवार सांगूनही दुर्गेश घराबाहेर पडला होता. काही वेळांनंतर दुर्गेश बाहेरुन घरी आला तेव्हा आरोपी राजेश आणि त्याच्या पत्नीने दुर्गेशसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने दुर्गेशवर वार करत हत्या केली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुर्गेशला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. समता नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी राजेशला अटक केली आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या