या कारणामुळे गुंड चन्याचा खून करून आरोपींनी मृतदेह पोत्यात घालून कृष्णा नदीत टाकला

0
128
Chanya Mulik Murder
Chanya Mulik Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
औदुंबर येथील कृष्णा नदीपात्रात वाळव्यातील गुंड रजनीश उर्फ चण्या मुळीक याचा खून करून टाकलेला मृतदेह सोमवारी आढळून आला होता. मात्र हा खून कोणी व कशासाठी केला याचा छडा लावण्यासाठी भिलवडी पोलीसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली होती. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दहा तासांमध्ये तो उघडकीस आणून गुन्ह्यातील संशयित आरोपी आकाश अहिर, संदेश उर्फ साहिल कदम, इम्रानचौस यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन अटक केली असून फरार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आल्याचे भिलवडी पोलीसांनी सांगितले.
संशयित आरोपी व मृत चन्या मुळीक यांच्यात पूर्ववैमनस्य होते. त्यांनी यापूर्वी एकमेकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून मारहाणही केलेली होती. त्यातूनच मृत चन्या हा आपल्याला जीवे मारेल या भितीने या संशयित चार आरोपींनी संगनमत करून चन्याचा कायमचाच काटा काढला. तो एकटा असल्याचे पाहून त्याचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींनी गुंड चन्याचा वाळव्यात खून केला. त्याच्या मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात घालून त्यास दगड बांधून  आमणापूर येथील कृष्णा नदीच्या पुलावरून नदीत टाकले होते. नदीप्रवाहाबरोबर वाहत ते औदुंबर येथे आले.
खून करून पुरावा नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला याबाबत भिलवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे, उपनिरीक्षक विशाल जगताप व सहकारी पोलीसांनी कसोशीने गुन्ह्याचा तपास करून अवघ्या दहा तासात छडा लावला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारूगडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here