पुणे प्रतिनिधी | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुन मधून विधानसभा निवडणुक लढणार असल्याची माहिती आहे. मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या विद्यमान आमदार आहेत. प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्षांनाच कोथरुड मधून उमेदवारी देण्यात आल्याने कुलकर्णी यांचा विधानसभेचा पत्ता कट झाला आहे. चंद्रकांतदादांनी कोथरुड हा मतदार संघ निवडल्याने राजकिय वर्तुळात त्यावर जोरदार चर्चा सुरु आहे.
चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर मधून विधानसभा लढतील अशा चर्चा होत्या. मात्र पक्ष श्रेष्ठींकडूनच कोथरुड येथून लढण्याच्या सुचना आल्याने पाटील कोथरुड येथून विधानसभा लढणार आहेत. चंद्रकांतदादा विधान परिषदेचे आमदार असल्याने विरोधकांकडून त्यांना कायम तुम्ही लोकांतून निवडून आलेले नाहीत असे टोमने मारले जात होते. यामुळेच चंद्रकांतदादा सेफ मतदार संघाची चाचपणी करत होते.
कोथरुड हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मागील वर्षीदेखील भाजपला येथून विधानसभेला मोठे मताधिक्य मिळाले होते. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांतही भाजपच्या गिरिष बापट यांना एकट्या कोथरुड मधून दीड लाखांचे लीड मिळाले होते. यासर्व कारणांमुळेच कोथरुड या सेफ मतदार संघाची निवड चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेसाठी केली असल्याचे बोलले जात आहे.
ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाच्या बातम्या –
काँग्रेसची पहिली यादी झाली लीक ; यादीत आहेत या बड्या नेत्यांची नावे
युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल
सेना भाजप युतीचे सरकार आल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री ?
चंद्रकांत पाटलांची निवडणुकी करिता कागदांची जुळवाजुळव सुरू ?
सावधान ! तुम्ही येवले चहाचे शौकीन आहात ; येवले चहावर झाली अन्न प्रशासनाची कारवाही