दिनविशेष | सुनिल शेवरे
भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘हिंदी चीनी भाई भाई’ चा नारा देऊन सुद्धा १९६२ मध्ये चीन ने भारतावर आक्रमण केले. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्षच झालेली असल्यानं आतंरराष्ट्रीय सुरक्षेच्याबाबतीत म्हणावी तशी सजगता आपणाकडे नव्हती. त्यामुळे १९६२ च्या भारत-चीन युद्धात आपला दारुन पराभव झाला. आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताचे अपुरे सैन्य बळ असल्याचा फायदा चीन ने उचलला. मात्र या युद्धामूळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षेवर मोठे प्रश्न चिन्ह उभे राहिले आणि सीमावर्ती भागासाठी वेगळं असं खास सुरक्षा दल उभारण्याची गरज प्रकर्षाणे जाणवू लागली.
अशातच १९६५ मध्ये गुजरात च्या कछ सारख्या सीमा भागात चौक्यांवर हल्ला झाल. आता मात्र सीमा सुरक्षा प्रश्न गळ्यापर्यंत आला होता. जय जवान, जय किसान अशी घोषणा देणारे लाल बहाद्दुर शास्त्री तेव्हा भारताचे पंतप्रधान होते. सुरक्षेचा प्रश्न ध्यानात घेऊन दिल्लीत तातडीची बैठक बोलावण्यात आली आणि बीएसएफ नावाची एक मजबूत आंतरराष्ट्रीय बल भारताने स्थापन केली.
इतर महत्वाचे –
नेताजी सुभाष चंद्र बोस – The Forgotten Hero