टीम HELLO महाराष्ट्र | आपल्या निवडणूक नियोजन कौशल्याने देशाचे लक्ष वेधून घेतलेले प्रशांत किशोर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा सोबत राहणार आहेत. मधल्या काळात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना प्रशांत किशोर यांचे महत्व समजले आहे. म्हणून त्यांच्याशी जुळवून घेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्याची तयारी भाजपने केली आहे.
२०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी आपल्या रणनीती चा आविष्कार दाखवला. नंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत किशोर यांनी दमदार कारागिरी केली आणि पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले. असे म्हणतात की २०१४ ची निवडणूक झाल्यावर प्रशांत किशोर यांनी भाजपाचे मोठे पद मागितले होते आणि यातूनच अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यात मतभेद झाले. भाजप आणि प्रशांत किशोर यांच्या वादाची परिणीती म्हणून बिहार विधानसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांचा हात धरला. प्रशांत किशोर यांच्या रणनितीवर भाजपची मदार आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यात याकाही दिवसात बैठक पार पडली असून यात प्रशांत किशोर यांनी युवकांचे संघटन मजबूत करा असा सल्ला भाजपला दिला असल्याचे बोलले जात आहे. तसेच सोशल मीडियात विरोध वाढत आहे म्हणून आता सोशल मीडियात सक्रिय होण्यास ही प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे. प्रशांत किशोर यांचे भाजपला महत्व कळले असल्याने येत्या काळात भाजपच्या महत्वाच्या पदावर प्रशांत किशोर दिसले तर नवल न वाटावे.
सुरज शेंडगे