नवी दिल्ली| राज्यसभेच्या रिक्त चार जागी राष्ट्रपतींनी राकेश सिन्हा, शेतकरी नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ माहापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह यांची वर्णी लावली आहे.
कोण आहेत त्या चार व्यक्ती?
राकेश सिन्हा हे संघ विचार धारेचे आहेत. तसेच भाजपची आणि आरएसएस ची बाजू माध्यमात समर्थपणे मांडतात. सिन्हा यांचे ‘राजकीय पत्रकारिता’ नावाचे हिंदी भाषेतील पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. सोनल मानसिंह या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत. प्रतिष्ठेचा नाट्य संगीत अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच पद्मभूषण पद्मविभूषण या नागरी सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. राम शकल हे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शेतकरी नेते आहेत. शिवाय माहापात्रा ओडिसचे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या तिन्ही पुरस्काराने महापात्रा यांना सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रपती नियुक्त चार रिक्त जागी कोणाची वर्णी लागणार याबद्दल बरेच तर्क वितर्क रंगवले जात होते. कपिल देव, माधुरी दिक्षित अशी नावे चर्चेत येत होती. परंतु राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्तांची नावे जाहीर केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.