टीम, HELLO महाराष्ट्र | महाराष्ट्रात अनेक गणपती मंडळे आहेत. पण त्यातील काही गणपतींचे एक वेगळेच महत्व आहे. त्यातीलच एक गणपती म्हणजे जी.एस.बी सेवा मंडळाचा गणपती या गणपतीने यावर्षी आपलं वेगळेपण राखलं आहे. या ठिकाणी बाप्पा सोन्याने सजलेले आपल्याला पाहायला मिळतात.
येथील बाप्पांच्या मूर्तीला सजवण्यासाठी यंदा 70 किलोच्या जवळपास सोने वापरण्यात आले आहे. या गणपती समोर 5 दिवसात 65 हजाराहून अधिक पूजा केल्या जातात.
तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही पुण्यात गणोशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्याचे ग्रामदैवत अर्थात पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती या गणपतीची काल सकाळी ११. ४० वा. प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची मिरवणूक मुख्य मंदिरापासून काढली. ही मिरवणूक आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मार्गे उत्सव मंडपात दाखल झाली. या मिरवणुकीमध्ये दरबार बँड, प्रभात बँड, देऊळकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई वादन अशी वाद्यांची दमदार हजेरी लागली होती. या मंडळाने यावर्षी “श्री गणेश सूर्य मंदिर” देखावा उभारला आहे.
पुण्यातील सर्वात महत्वाचा गणपती म्हणजे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या पुण्यातील केसरीवाडा गणपती. या गणपतीची प्राणप्रतिष्ठा काल दुपारी १२:३० झाली. हा पुण्यातील पाचवा मानाचा गणपती आहे.
नाशिकमध्ये देखील गणपती बाप्पाचं उत्साहात आगमन झालं. बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या दुर्मिळ वनस्पती, पुजासाहित्य, नैवेद्यासाठीच्या २१ भाज्या खरेदी करण्यासाठी नाशिककर गर्दी करत आहेत.