राहुल गांधी हे फक्त मूर्खच नाहीत तर महामूर्ख आहेत; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

चंदिगढ । भाजपचे वाचाळवीर नेते वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. या वाचाळवीर नेत्यांमध्ये आणखी एका भाजप नेत्याची भर पडली आहे. हरियाणामधील कुरुक्षेत्र येथील भाजप खासदार नायब सिंह सैनी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी याच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख महामूर्ख असा केला आहे. जर कोणी महामूर्ख असेल तर ते राहुल गांधी आहेत अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य नायबसिंह यांनी केले आहे. राहुल गांधी हे फक्त मूर्खच नाहीत तर महामूर्ख आहेत असेही वक्तव्य त्यांनी केले.

नायबसिंह म्हणाले की, जर कोणी महामूर्ख असेल तर ते राहुल गांधी आहेत. कारण त्यांना नागरिकत्व कायदा काय आहे, कशासाठी आहे हेच माहित नाही. आपण कोणत्या गोष्टीचा विरोध करत आहोत याची राहुल गांधींना कल्पानाच नाही.

नायबसिंह म्हणाले की, राहुल गांधी यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या कायद्यामुळे कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व हिसकावलं जाणार नाही ही गोष्ट राहुल गांधींना माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. भाजपाने सुरुवातीपासून काँग्रेस नागरिकत्व कायद्यासंबंधी लोकांमध्ये गैरसमज परसवत असल्याचा आरोप केला आहे.