अहमदनगर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची महाजनादेश यात्रा, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आणि काँग्रेसची पोलखोल यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी एका सभेत राम शिंदेंवर जोरदार हल्ला चढवत शिंदे हे बॅनर मंत्री असल्याचे सांगितले होते. ‘गेली १० वर्षे लोकप्रतिनिधी असलेले राम शिंदे हे सध्या गावागावात विकास केल्याचे बॅनर लावत आहेत. गावात विकास केल्याचे त्यांना बॅनर लावून सांगण्याची वेळ आली असल्याने राम शिंदे हे बॅनर मंत्री अशा तिखट शब्दांत रोहित पवार यांनी टीका केली होती. त्यावर प्रति उत्तर देताना राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
शिंदे म्हणाले की, ‘आपण केलेल्या कामाची माहिती जनतेला देणे यात काही गैर नाही. मी फक्त बॅनर बाजीचं केली आहे कामचं केलं नाही असे रोहितला वाटत असेल तर त्याच्याशी आपण खुली चर्चा करण्यास तयार आहे.’ असे आवाहन राम शिंदे यांनी दिले आहे. बाजीचं
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्तान जामखेड बाजार तळावर आयोजित जाहीर सभेत बोलताना रोहित पवार यांनी ही टीका केली होती. रोहित पवार हेच आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असल्याचं सध्या स्पष्ट झालं आहे. याची पुष्टी सभेस उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. रोहित पवार हेच कर्जत-जमखेडचे पुढचे आमदार असतील असे जाहीर वक्तव्य त्यांनी यावेळी केले होते.