मुंबई प्रतिनिधी। ‘आयुष्यात अशी काही नाती असतात, जिथे हिशेब नसतात, व्यवहार नसतात, असतो केवळ आदर, प्रेम, सन्मान. असंच एक नातं लताजींसोबत आहे’….अशा भावूक शब्दांत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लता मंगेशकर यांचा आज ९० वा वाढदिवस आहे.त्या निमित्त आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एका वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिलाय आहेत.
लता दिदींना शुभेच्छा देण्यासाठी महानायक अमिताभ यांनी एक दीर्घ व्हिडिओ ट्विटर वर पोस्ट केला आहे. सात मिनिटांच्या या व्हिडिओत सुरूवातीला अमिताभ यांनी दिदींना मराठीत शुभेच्छा देण्याचाही प्रयत्न केला आहे. आपल्या आयुष्यात असलेला कवितांचा, गाण्यांचा, साहित्याचा प्रभाव आणि त्याचा आयुष्यात येणाऱ्या उत्कट तर कधी नैराश्येच्या क्षणांमध्ये मनाला उभारी देण्यासाठी कसा उपयोग झाला हे अमिताभ या व्हिडिओत अमिताभ सांगतात.
देवी सरस्वतीच्या रुपाचं ते वर्णन करतात आणि लता दिदींच्या एकाच आलापमध्ये या सर्व देवींच्या मूर्ती, या कविता, ही पुस्तकं जीवंत होतात.पसायदानातील दोन ओळी सांगत लता मंगेशकरांच्या आवाजाने कसं संतांचं काम केलंय, ते अमिताभ सांगतात. लता मंगेशकरांचे ऋण कधीच फेडता येणारे नाही, असे सांगत अमिताभ यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
T 3302 – On Lata ji’s 90th birthday, my sentiments and my feelings .. with deep regard and respect।।
लता मंगेशकर जी की ९० वी वर्ष गाँठ पर, मेरे कुछ शब्द ; कुछ भावनाएँ , आदर सहित pic.twitter.com/RhL461ZIR0
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 28, 2019